
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे
संभाजी गोसावी
पुणे :- गुढीपाडव्यांच्या मुहूर्ताच्या आदल्या दिवशी पत्नीने शारीरिक संबंध ठेवून न दिल्यांने शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने वार करीत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यांतील केंदूर गावात घडली. पत्नीच्या त्यानंतर पती पोलीस स्टेशनला स्वता हून हजर आशा रामदास पवार या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरूंन शुक्रवारी रात्री पती-पत्नी एकत्रित झोपले असताना पती रामदास पवार यांने पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यांचा प्रयत्न करीत असताना पत्नी आशाने रामदास याला चापट मारून मला स्पर्श करू नकोस, मला तुझी गरज नाही असे म्हटल्यानंतर पती रामदास राग अनावर झाल्यांने घरांतील चाकूने पत्नीच्या अंगावर डोके, कान , पोट आणि हातांवर गंभीर वार केले यांमध्ये पत्नी गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर पत्नीचा जीव गेल्यांची खात्री झाल्यानंतर पती रामदास पवार यांनी स्वता हून शिक्रापूर पोलिस ठाण्यांत जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांकडूंन पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यांत आला. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेंमत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखांली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.