
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लुट करीत आहे.५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी परभवाच्या चिंतेने पेट्रोल,डिझेल,एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती सरकारने रोखुन धरल्या होत्या.परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरूवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल,डिझेल मध्ये दररोज ८० पैशाने वाढवत ३.२० रूपयाची वाढ केली तर एलपीजी गॅंस सिलेंडर ५० रूपयांनी महाग केला असुन तो आता काही ठिकाणी १ हजार रूपयाच्या वर गेला आहे.
यासोबतच PNG आणी CNG गॅसही महाग केला आहे.तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगने मुश्किल झाले आहे.तसेच इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे,सर्वसामान्य जनतेची खुलेआम लुट सुरू आहे,पण केंद्रातील सरकार मात्र डोळेझाकुन बसले आहे.
जनतेला लुटणाऱ्या सर्वसामन्यांच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवुन केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी यांनी ‘महागाई मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला,त्याअनुषंगाने मा.प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व अमरावती जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख,पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या सुचनेनुसार,आमदार बळवंतजी वानखडे यांच्या नेतृत्वात दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता नवीन बस स्थानक ठिकाणी गॅस सिलेंडर,स्कुटर,मोटरसायकल ला हार घालून महागाई विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
आंदोलन करतेवेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष,प्रमोद दाळु,शहराध्यक्ष प्रदिप देशमुख,निखिल कोकाटे युवक अध्यक्ष कलीमभाई,मुशफिक अली,दिलीप खळसे,रमेश सावळे,सचिन वाघमारे महेश ढोके,विनोद हाडोळे,राजु हाडोळे,संदीप मोरखडे,गजानन आठवले, सलिमोद्दीन,विपुल नाथे,हारुनभाई,राजुभाऊ बोबडे,संजय सरोदे,अजय डिके,सोन्याभाऊ जुनगरे,विनायक सरकटे,स्वराज वानखडे,निलेश ढगे,धरमदास इंगळे,प्रशांत कोल्हे,राजु कुरेशी,किशोर खडसे,आबिदभाई,जहिर बेग,सचिन वाघमारे,अमरभाऊ शिंगणे सरपंच,वासुदेव इंगळे,नईमभाई,धिरज धुळे,धिरज काळे व असंख्य कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.