
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.२ एप्रिल स्थानिक द्वी.हरीभाऊ पांडव मंगल कार्यालयात पंचायत समिती नांदुराची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा दि.३१ मार्च २०२२ ला संपन्न झाली.ह्यावेळी विविध विभागांचे अधिकारी यामध्ये शिक्षण,आरोग्य, कृषी, बांधकाम, एकात्मिक बालविकास, लेखा, पशुसंवर्धन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल वाचन केले.ह्यावेळी कृषी अधिकारी चव्हाण यांनी आमसभेत पीक परिस्थिती व पीक पेरणी अहवाल २०२१-२२ सादर केला.यामध्ये नांदुरा तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ५४०२५.१६ हेक्टर असतांना एकूण क्षेत्रफळ ४८९७४०६० हेक्टर अहवालानुसार दिसते.
रब्बी हंगाम सन २०२१-२२ पीक पेरणी अहवालानुसार सरासरी क्षेत्र हेक्टर कमी असतांना पेरणी क्षेत्र मात्र अधीक हेक्टर मध्ये असल्याचे अहवाल वाचन करतांना व वार्षिक आमसभा अहवालानुसार दिसून येते. यामध्ये गहू सरासरी क्षेत्र हेक्टर मध्ये १४०० असुन नियोजन व पेरणी १४३० हेक्टर, रब्बी मका १३९० हे.नियोजन व पेरणी १४२४ हे.,हरभरा ४५०० हे., नियोजन व पेरणी ४००६ हे.कांदा २००हे.नियोजन व पेरणी ३९७ हे., कांदा बियाणे ८० हे.नियोजन व पेरणी १३६.२० हे.,रब्बी सोयाबीन १० हे.नियोजन व पेरणी १८ हे. ,रब्बी ज्वारी १० हे.नियोजन व पेरणी १३ हेक्टर, म्हणजे एकूण सरासरी क्षेत्र हेक्टर ७५३० व नियोजन व पेरणी क्षेत्र ७४२४.२० हेक्टर दिसते.
यामध्ये हरभरा सोडून इतर पीकामध्ये क्षेत्र हेक्टर कमी असतांना नियोजन व पेरणी अधिक क्षेत्रावर दिसून येत आहे.कृषी प्रधान भारत देशातील कृषी विभागातील अधिकारी अशा प्रकारचा अहवाल सादर करत असल्यास देशाचा विकास झालाअसेच म्हणावे लागेल !यामध्ये आश्चर्याची बाब ही की,भरगच्च उपस्थिती असलेल्या सभागृहात कोणीही एक शब्द सुद्धा बोलले नाही किंवा प्रश्न विचारला नाही .म्हणजे उपस्थितीतांना आकडेवारी समजली नाही की,आणखी काय हा मात्र संशोधनाचा विषय आहे !
मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा व सरपंच मेळावा सपन्न झाला . विचारपिठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पदमराव पाटील,गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी देशमुख, न.प.मुख्याधिकारी आशिष बोबडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी तथा प्रशासक समाधान वाघ यांनी तर संचलन भगवान सोयस्कर व आभार प्रदर्शन विजय सोगाग्रे यांनी केले.
कार्यक्रमाला तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणारे अधिकारी, कर्मचारी, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयएसओ मानांकन प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ह्यावेळी सरपंच व ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी व समस्यांची नोंद घेण्यात आली.कोविड १९ महामारी प्रादुर्भावानंतर झालेली ही पहिली आमसभा अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.