
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
परतूर :- तालुक्यातील डोल्हारा,बाबई वाळू धक्क्यावर बेकायदा जेसीबी मशीनचा वापर करुन नियमबाह्य पध्दतीने वाळू उपसा होत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील वाळू पट्ट्याचे लिलाव झाले असून या लिलावधारकाकडून नियमांची मायपल्ली करत अवैध पद्धतीने उत्खनन सुरू आहे विशेष म्हणजे तालुका महसूल प्रशासनाने याकडे बघून कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील आठवड्यातच जेसीबी यंत्राच्या साहाय्याने दुधना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वाळूचे उत्खनन होत असल्याबाबतचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असतांना अजूनही तालुका महसूल प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे. जर महसूल प्रशासनच जर बघून कानाडोळा करत असेलतर मग जनसामान्य जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण होत आहे.
संबंधित लिलाव धारक हा एका मोठ्या राजकीय पक्षांचा कार्यकर्ता असल्याने स्थानिक महसूल प्रशासनावर दबाव आणत असल्याची चर्चा ही तालुक्यात आहे. याबाबत दुधना पात्रात सुरू असलेल्या लिलाव झालेल्या धक्क्यावरून नियमांची मायपल्ली करत होणारा वाळू उपसा रोखणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील अनेक दिवसातून महसुल प्रशासनाच्या शासन परिपत्रकातील नियमा प्रमाणे मजुराकडून वाळू उत्खनन न करता संबंधित लिलावधारक वाळू घाटावर जेसीबी मशीनच्या साह्याने अवैधरित्या नियमबाह्य पध्दतीने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला नसणे हे हस्यादपद गोष्ट आहे