
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- शेटफळ हवेलीचा राजा श्री भैरवनाथ ‘चैत्र यात्रा’ गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे झालेली नाही. मात्र यंदा ६ व ७ एप्रिल रोजी होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज गुढीपाडवा वाचन व भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली गावची भैरवनाथ यात्रा हि संपूर्ण पंचक्रोशीत सर्वात मोठी यात्रा असते.यामुळे बाहेरगावी असलेले शेटफळ वासी नागरिक आपल्या परिवारासह गावी येतात व मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करतात.
यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्री.नाथ बाबांचा वाजत गाजत , गुलालाची उधळण करीत निघणारा छबिना, फटाक्यांची आतषबाजी,हालगी,बॅंजो आणि नाथबांबाच्या नावाचा होणारा जयघोष हे असते. यात्रे निमित्त भैरवनाथ मंदिरा वरती तसेच मंदिर परिसरात परिसरामध्ये आकर्षक आशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील नावाजलेला हा तमाशा आहे,तर दुस-या दिवशी यांचा ऑर्केस्ट्रा आहे.
तसेच भव्य असे कुस्त्यांचे मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात येते, या कुस्ती मैदान मध्ये महाराष्ट्रातील नामांकित पैलवान कुस्ती खेळतात, तसेच काही आजी माजी पैलवान व राजकीय क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवतात, या सर्वांचा भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान केला जातो ,आणि या कुस्त्यांच्या मैदा नंतर यात्रेची सांगता होते. यंदाच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असून भावनिकांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. यात्रेसाठी कार्यरत असणारे मंदीर व्यवस्थापन, स्टॉलधारक, संबंधित कर्मचारी, ठेकेदार या सर्वांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असतील. या यात्रेस खाद्य पदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या स्टॉलधारकांनी अन्न औषध प्रशासन विभागाची परवानगी आवश्यक असेल. भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाची तसेच भाविकांसाठी मंदिरात येण्या-जाण्याच्या मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
भैरवनाथ यात्रेत सुमारे १ लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. यंदा अधिकचे 30 टक्के भाविक भैरवनाथ यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेवून सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी यात्रा कमिटीने केल्या आहेत.
तसेच, भाविकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.