
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
बुलढाणा :- दि. 3 केंद्र सरकारने वाढलेला इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शहरातील जयस्तंभ चौकातील पेट्रोल पंपासमोर मोर्चा काढून थाळी बजावआंदोलन केले.यावेळी ग्राहकांना चॉकलेट वितरित करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. हे आंदोलन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल ,डिझेल, गॅस,दर वाढ मोठ्या प्रमाणात केली. इंधन दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ दररोज वाढत आहे . सर्व स्तरावरून महागाईच्या विरोधात मोदी सरकार व भाजपा वर सरकारवर टीका होत आहे.
या महागाईच्या विरोधात युवा सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेना सचिव अरुण सरदेसाई यांनी महागाईच्या विरोधात आवाज उठवला आहे. प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने बुलढाणा येथे जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड, युवा नेते कुणाल गायकवाड, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे, शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड आ दीच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करून नाराजी व्यक्त केली. यावेळी आंदोलन युवा सेनेचे आशिष जाधव ,विजय जायभाये, उमेश कापुरे, मुन्ना बेडवाल ,ओम सिंग राजपूत, गजानन दांडगे, शाम पवार, पप्पू गुजर ,दीपक तुपकर, मोहन प राड,अनुप श्रीवास्तव, श्रीकृष्ण शिंदे ,निलेश राठोड ,सचिन हेरोडे, इत्यादी उपस्थित होते.