
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहरात दि.३ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला असून लोहा शहरातील बिडवई नगर येथून पालखी सोहळा मोठ्या उत्साहात काढण्यात आली या स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व त्यांच्या अर्धांगिनी नगरसेविका गोदावरीताई गजानन सुर्यवंशी यांनी सहभाग नोंदवून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन खांद्यावर पालखी घेतली .
दि. ४ एप्रिल रोजी लोहा येथे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्यावतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री बिडवई नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून पालखीचे पूजन करून पालखी मार्गस्थ करण्यात आली.
यावेळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतना लोहा नगरीचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी व त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ.गोदावरीताई सुर्यवंशी या दाम्पत्याने स्वता पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखी खांद्यावर घेतली टाळ मृदुंगाचा गजर, पारंपारिक वाद्ये, आणि श्री स्वामी समर्थांचा अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थांच्या भक्ती सागरात न्हावून निघाला होता.लोहा शहरातील व परिसरातील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.