
दैनिक चालु वार्ता
संभाजी गोसावी प्रतिनिधी
पाचगणी ते महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर बस स्थानक ते काचबावडी नाक्याच्या मध्यवर्ती रेशमी चौकांजवळ एका वळणावर पर्यटकाची चार चाकी पलटी होऊन अपघात घडल्यांची घटना नुकतीच घडली या अपघातात एक महिला जखमी झाली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती की रेशमी चौक शेजारील निवासरकर बंगल्याजवळ एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूच्या डोंगरावर धडकली आणि पलटी झाली यात गाडीत दोघे जण होते.
या मधील महिला जखमी झाली असून तिच्या डोक्यांला जखम झाली असून उपचारासांठी तिला रुग्णालयांत दाखल केले असल्यांंची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच पाचगणी पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफिंक पोलीस प्रमुख अरविंद माने व त्यांचे सहकारी अपघात ठिकाणी तातडीने दाखल झाली त्यांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लगेच केन बोलून गाडी बाजूला काढली व वाहतूक पूर्ववत केली.