
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई
राजेगाव :- दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने १ एप्रिल २०२२ पासुन राजेगांव मधील प्रत्येक कुंटबातील एका मुलीच्या लग्नासाठी ५००० / – रुपये कन्या सन्मान निधी योजना म्हणून मुलीच्या लग्नादिवशी मुलीच्या पालकाच्या हाती सुपूर्त करण्यात येणार आहे.
अशी घोषणा दिव्य समाज निर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाहीर केली. राजेगांव मधील गोरगरीब कुंटूबातील मुलीच्या लग्नासाठी सहकार्य होऊन मुलीचा एक प्रकारे सन्मान होऊन पालकांना छोटासा आधार होणार आहे .
यावेळी दिव्य समाज निर्माण संस्थेच्या सचिव सीमा शितोळे – देशमुख , राजेगांचे पोलीस पाटील महेश लोंढे , राजेंद्र कदम , संजय भोसले , अरुण भोई , विठ्ठल थोरात , राजेंद्र मेंगावडे ,नवनाथ भोसले , पोपट खंडागळे ‘ योगश वाघमारे , भरत मोरे , गणेश वाघमारे , कुमार ढमे मयूरी मोरे , प्रिया वाघमारे, दिपाली मोरे ,सीमा मोरे , प्रियंका वाघमारे उपस्थित होते .