
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी जालना
संभाजी गोसावी
जालना :- जिल्ह्यांतील भोकरदन तालुक्यांत लग्नांच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली असून. या नववधूकडूंन तब्बल 2 लाख 90 हजार याचे दागिने या नवरीने गायब केले असून यामागे मोठी टोळी असण्यांची शक्यता आहे. याबाबत पारध पोलीस ठाणेकडूंन मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यांत सेंलुद गावात ही घटना घडली.
लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच नववधूने दागिने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला. सेंलूद ता. भोकरदन येथील शेतकरी कुटुंबातील राजू दौलत काकडे यांचा मुलगा ज्ञानेश्वर यांचे लग्न जमत नसल्यांने त्याने जालना येथील तुकाराम शिंदे यांच्यामार्फत हिंगोली शहरांतील दिलीप जाधव यांची मुलगी सोनू हिच्यांशी लग्न ठरविले तुकाराम शिंदे यांनी लग्नासांठी तीन लाखांची रुपयांची मागणी केली होती.
अखेर नवरदेव कडील मंडळींचा 2 लाख 90 हजार रुपयांचा व्यवहार ठरला अखेर मध्यस्थी तुकाराम जाधव यांने दोन दिवसांपूर्वी सेंलुतद गावांतील वधौना परिसरांतील भुयरेश्वर मंदिरात या दोघांचा विवाह लावून दिला. मात्र लग्नांच्या दुसऱ्यांच दिवशी नववधूने अंगावरील दागिनेसह कोणालाही न सांगता घरांतून धूम ठोकली नवरदेव कडील मंडळींनी पारध पोलीस ठाण्यांत धाव घेत गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे जालना जिल्ह्यांत एकच खळबळ उडाली.