
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- स्थानिक अंजनगाव सुर्जी तालुका व शहरच्या वतीने युवासेनेचे राज्यव्यापी थाली बजाओ खुशीया मनावो अभिनव आंदोलन युवासेना राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांच्या संकल्पनेतून जिल्हा विस्तारक राज दिक्षित,विभागीय सचिव सागर देशमुख,जिल्हाप्रमुख प्रमोद धानोकार,उपजिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख अभिजीत भावे,शहरप्रमुख अक्षय गवळी यांच्या नेतृत्वात बस स्टॅन्ड येथे करण्यात आले.
केंद्रच्या भाजप सरकारच्या काळात दिवसेंदिवस महागाईचा कळस गाठत आहे.दररोज लागण्याऱ्या जीवानाश्यक वस्तु,तसेच पेट्रोल,डिझेल,गॅसचे भाव दररोज वाढतच आहे.मोठे मोठे आश्वासन देवुन भाजप सत्तेवर आली.आम्ही महागाई कमी करु असे वेळोवेळी आश्वासने देवुन कमी करायच्या जागी वाढवतच आहे.या देशातील जनतेची फसवणूक केली.आज युवासेनेच्या वतीने कटल्यात गॅस टाकी ठेवुन केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणा देवुन अनोखा आंनद उत्सव आंदोलन करण्यात आले.
यावेळी विनोद पायघन,अमोल पाटील,लखन टिपरे,आकाश येऊल,अमोल फाटे,प्रविण बोडखे,विनोद पाटील,अंकुश होटे,अंकीत सारंदे,राहुल ताडे,राजेश बांगर,शंतुनु मोरे,गजानन विजेकर,दिनेश बोडखे,चेतन रावळे,विक्रम धुळे,पवन पाचरे,यन्देश जावरकर,सागर काळपांडे,सुशांत देशमुख,प्रशांत अस्वार,हर्षल आकोटकर,श्रेयस राऊत,प्रमोद अरबाड,संतोष देशमुख,विक्की पाटील,आकाश पाटील,आकाश फाटे,धिरज गवळी,सागर दातीर,आदि युवासैनिक उपस्थित होते.