
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा.दि.४ :- मागील तीन महिने झाले आपल्या मलकापूर-नांदुरा विधानसभा मतदारसंघात घरगुती मीटर मिळत नाही मिटरसाठी लोकांनी अर्ज केलेले आहेत व पैसे सुध्दा भरले आहेत तसेच आपल्या कार्यालयाच्या चकरा मारू मारू थकले आहेत. आपणास विनंती लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना घरगुती मीटर उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा MSEB ऑफिस समोर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेना नेते वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात व युवासेना मलकापूर-नांदुरा विधानसभेच्या वतीने महावितरण कंपनी ला देण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र भोजने,शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप पाटील,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर पांडव,युवासेना तालुका चिटणीस राहुल राऊत,विभाग प्रमुख ऋषिकेश जुमळे,सोशल मीडिया प्रमुख निलेश तायडे,माजी तालुका प्रमुख युवासेना अर्जुन तांगडे,युवासेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम सोनोने, सौरभ पाटील,गौरव घोराडे,योगेश इंगळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.