
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील हापूस आंब्याला स्वतःची वेगळी चव, आकार आणि वैशिष्ट्ये आहेत. पुराणकाळातील ग्रंथांमधे, त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडात आणि शिवकालीन ग्रंथात इथल्या आंब्याचे उल्लेख आहेत. याचा आधार घेऊन जुन्नर मधील शेतकरी इथल्या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीय आहेत. पण याला कोकणातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हापूस हा फक्त कोकणचाच आहे, असं कोकणातील बागायतदारांचं म्हणणे आहे. असे असूनही मधुर स्वाद व चवीमुळे जुन्नर मधील हापूस आंब्याला ग्राहकांची फार मोठी पसंती व मागणी आहे.