
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता. प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- आज दि ४/०४/२०२२ रोजी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबास घराकडे परत निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबल च्या ओमनी कारची धडक रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकला बसून झालेल्या अपघाता मध्ये दोघे भाऊ जागीच ठार तर कुटूंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि ४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या दरम्यान पंढरपूर रस्ता जवळील सारोळे पाटी येथे घडली. दयानंद अण्णाराव बेलाळे वय ३० असे पोलीस कॉन्स्टेबल चे नाव असून त्याचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे वय ३२ दोघे रा रोखडा सावरगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर असे मृताचे नाव आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेली माहितीअशी की पंढरपूर वरून श्री पंढरपुरच्या पाडूरंगाचे दर्शन घेऊन घराकडे परत निघाले असताना अचानक काळाने घाला घातला ते पंढरपूर हुन मोहोळ कडे निघालेल्या एम एच १२ एफ झेड ७३७७ या ट्रकचालकाने सारोळे पाटी जवळील सह्याद्री ढाब्या समोर आपली ट्रक धोकादायक स्थितीत उभा करून धाब्यावर जेवण घेण्यासाठी गेला होता. यावेळी आपल्या कुटुंबासह निघालेले सोलापूर येथील मुख्यालयात कॉन्स्टेबल म्हणून काम करणारे दयानंद अण्णाराव बेलाळे त्यांचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे त्यांची पत्नी स्वाती उर्फ राणी सचिन बेलाळे वय २२ व दिपाली उर्फ जयश्री दयानंद बेलाळे वय २५ व त्यांची दोन लहान मुले त्रिशा वय आठ वर्ष व श्लोक वय १ वर्ष हे सर्वजण आपल्या ओमनीकार एम एच १२ एन ई ४४८७ या कार ने थांबलेल्या ट्रक ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दयानंद व त्याचा भाऊ सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर या दोघांच्या पत्नी स्वाती व दीपाली व मुले त्रिशा व श्लोक हे सर्व जण गंभीर जखमी झाले यांना खाजगी वाहनातून सोलापूर येथील खाजगी सीएनएस या हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले या अपघाताचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत दाखल करण्यात आला नव्हता मात्र कॉन्स्टेबल दयानंद यांच्या मृत्यूने मात्र मोहोळ पोलीस ठाणे व सोलापुर मुख्यालय यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.