
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
लोणंद :- लोणंद पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व गडचिरोली आदिंवासी भागांत उल्लेखनींय कर्तव्यदक्ष सेवा बजावत असताना ऐतिहासिंक सातारा जिल्हा पोलीस दलांत मा.दत्तात्रय दराडे साहेब यांची पदोन्नती झाली. पुरीगोसावी आणि दराडे साहेब यांचा परिचय प्रथम सोशल मीडिंयाच्या माध्यमांतून झाला होता. सातारा जिल्हा पोलिस दलात मुख्यालयांत हजर होताच पुरीगोसावी यांनी दूरध्वनीच्या माध्यमांतून दराडे साहेबांचे अभिनंदन केले होते.
दराडे साहेबांनी सातारा जिल्हा पोलिस दलात दाखल झाल्यांपासून त्यांनी आत्तापर्यंत फलटण ग्रामीण ठाणे , साखरवाडी पोलीस दुरक्षेत्र ,लोणंद पोलीस ठाणे अशा विविध पोलिस ठाण्यांचे काम पाहत आहेत. त्या अनुषंगाने पुरीगोसावी यांनी आज लोणंद पोलीस स्टेशनमध्ये दराडे साहेबांच्या कामगिरीबाबत कौतुक करीत त्यांचे शाल, श्रीफळ देऊन भव्य असे स्वागत केले. यावेळी पोलिस ठाण्यांतील काही कर्मचाऱ्यांची उपस्थिंती होती. यावेळी पुरीगोसावी यांनी साहेबांचे आभार मानले.