
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या महिन्यातच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची एक बैठक होणार असून या बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये गृहखात्याची अदला-बदल होण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.
साधारणत: 8 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे आणि या संदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याच्या कामकाजावरुन मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे वृत्त फेटाळून सुद्धा लावण्यात आलं होतं.
वाचा : प्रवीण दरेकरांची 3 तास चौकशी, पोलीस ठाण्यातून बाहेर येताच केला गंभीर आरोप इतकेच नाही तर निधी वाटपातही राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना डावलून कमी निधी वाटप केल्याचा आरोप होत होता. तसेच काँग्रेस पक्षाचे 25 आमदार नाराज असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. एकूणच या सर्व प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये येत्या बैठकीत चर्चा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे बोलून दाखवली आहे.