
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज दिनांक ५ एप्रिल रोजी होता या लाडक्या कर्तबगार नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोहा येथील शरद पाटील पवार यांचे निवासस्थान असलेल्या बाळाजी पाटील वाड्यात समोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी शरद पाटील पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर उसळला शहरी व ग्रामीण भागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोहा शहरासहीत बेरळी, मस्की, सावरगाव, देऊळगाव, सुनेगाव,पेनूर, आडगाव,माळाकोळी,माळेगाव, कलंबर, किरोडा, धानोरा ,अंतेशवर संपूर्ण लोहा तालुक्यातून कार्यकर्ते, मित्रमंडळी, नागरिक येत होते. लोहा शहरातील चळवळीत धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गोरगरीब शेतकरी शेतमजूराचे प्रश्न सोडविणारे कर्तव्यदक्ष लोकप्रिय माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक यांचा वाढदिवस आज लोहा शहरात मोठ्या उत्साहात त्यांच्या समर्थकांनी साजरा केला आला.
शरद पाटील पवार यांना नुकतेच खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार भाजपाच्या नगरसेवकांनी अविश्वास ठराव पारित केला. माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत व त्यांच्या वर पारित केलेल्या अविश्वास ठराव बाबत निर्भीडपणे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यामुळे लोहा शहरात व ग्रामीण भागातील त्यांच्या असंख्य कार्यकर्ते,मित्र मंडळी यांच्यात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली व शरद पाटील यांना भाऊ तुम्ही फक्त लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपले वजन आपली मेहनत, परिश्रम व कार्य आम्ही वाया जाऊ देणार नाही.
आगामी काळात होणाऱ्या जि.प.,पं.स. ,न.पा, व विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवूत असा नारा देत शरद भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हे म्हणत अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात साजरा केला लोहा शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा बॅनर लावले होते . त्यामुळे लोहा शहर वासियां सहित त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छाने तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले हे विशेष.