
दैनिक चालु वार्ता
दिनकर पावरा यांची बदली केल्यामुळे कोळी व मन्नेरवारलू समाजात मोठा जल्लोष !
मुखेड ता.प्रतिनिधी
मुखेड :- आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाज जात पडताळणीस विलंब लावणाऱ्या दिनकर पावरा यांच्या संदर्भात विधानसभेत प्रश्न मांडीत त्यांची बदली करुन कोळी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आदिवासी कोळी समाज मुखेडच्या वतीने लोकप्रिय आमदार डॉ.तुषार राठोड यांचा ९ एप्रिल रोजी वाल्मिक नगर मुखेड येथे भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास कोळी व मन्नेरवारलू समाजातील व्यक्ती जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन कोळी महासंघाकडून करण्यात आले असून या कार्यक्रमाला कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शंकर मनाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे मुखेड कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक गजलवाड यांनी माहिती दिली आहे.
आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजातील जात पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास विलंब लावुन समाजातील नव तरुणांवर एकप्रकारे अन्याय दिनकर पावरा यांच्याकडून करण्यात येत होता. यांच्या बदलीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असताना पाच वर्षांपासून पावरा त्याच ठिकाणी होता. या संदर्भात कोळी व मन्नेरवारलू समाजातील लोकांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याकडे तक्रार केली होती. या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनकर पावरा यांची बदली करा अशी मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी विधानसभेत लावून धरल्यामुळे शासनाकडून याची दखल घेत दिनकर पावरा यांची तडकाफडकी बदली केली आहे.
त्यामुळे मुखेड कोळी व मन्नेरवारलू समाजात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 9 एप्रिल रोजी आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजाच्या वतीने आमदार डॉ. तुषार राठोड यांचा भव्य नागरीक सत्कार ठेवण्यात आला आहे . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजातील लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुखेड कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक गजलवाड यांनी केले आहे.