दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
किल्लेधारुर विजयादशमीच्या निमित्ताने धारुर शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी फुलून गेल्या आहेत. दसरा सणानिमित्त घर आणि व्यवसायाचे ठिकाण, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवले जाते. याकरीता बाजारात याच दरम्यान तयार होणारा गोंडा मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होतो. धारूरमध्ये दसरा सणाकरीता एका दिवसातच जवळपास 10 टन झेंडू बाजारात दाखल झाला आणि हातोहात या फुलांची विक्री देखील झाली. लाल पिवळ्या रंगातील झेंडूच्या फुलांनी रांगोळ्या काढण्यासाठी आणि झेंडूच्या माळांकरीता हा झेंडू मोठया प्रमाणात खरेदी करण्याकरीता एकच गर्दी झाली होती.
शेतकऱ्यांना मिळतील तितक्याच पैश्यावर समाधान मानावे लागते धारुर तालुक्यातून झेंडू फुलांची विक्री करण्यासाठी काही शेतकरी देखील आले असून, पावसामुळे फुलांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने जिल्ह्याच्या मार्केटमध्ये दर मिळत नाही त्यासाठी गावागावांमध्ये जाऊन फुलांची थेट विक्री करावी लागते. यामध्ये झालेला खर्च जेमतेम हाती लागतकरावी लागते. यामध्ये झालेला खर्च जेमतेम हाती लागत असल्याचे फुलांची शेती करणाऱ्या शेतक-यांनी सांगितले. झेंडूची फुले फार काळ टिकत नाहीत. चोवीस तासांमध्ये फुले सुकून जातात आणि त्यामुळे नुकसान होते. जो दर येईल त्या दरांमध्ये फुलांची विक्री करुन हाती मिळेल त्या पैश्यावर समाधान मानावे लागते आहे. धारुर शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे अनेक फुलांची दुकाने थाटण्यात आली असून, दहा टनपेक्षा अधिक फुले विक्रीसाठी आले आहेत. सर्वसाधारण 80 ते 100 रुपये किलोने विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दसऱ्यानिमित्त व्यापारी दुकानांतील वजन काट्यांची पूजा करतात, फुलांची तोरणे लावली जातात. शिवाय वाहनांना सजविण्यासाठी किंवा वाहनांची पूजा करण्यासाठी झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये बहुतांशी फुलांची दुकाने रस्त्याच्या बाजूला मांडण्यात आली आहेत. औद्योगिक परिसरातही अशी दुकाने थाटण्यात आली आहेत. साधारण 150 रुपयांपासून 200 रुपये प्रति किलो फुलांची विक्री होणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी 80 ते 100 रुपये दराने विक्री होत आहे. यावर्षी फुलांची आवक जरी ब-यापैकी असली तरी शेतक-याला दर समाधानकारक मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.