
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनिकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचा-यांचा संप अजूनही सुरूच आहे. संपकरी कर्मचा-यांवर कारवाईसाठी राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेताच कर्मचारी भानावर आले आहे. कारवाईच्या धास्तीने केवळ दोन दिवसात नांदेड विभागातील ७११ कर्मचारी कामावर रुजु झाले आहेत. यामुळे एसटीच्या चाकांना आता गती आली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनिकरण करावे यासह इतर मागण्यासाठी नांदेडसह राज्यभरातील कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
ऑक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेला हा संप मागील पाच महिन्यापासून सुरूच आहे.या संपामुळे महामंडळाचे दररोज कोटयावधी रूपयांचे नुकसान होत आहे. एकटया नांदेड विभागास कोटयावधींचा भुर्दंड बसला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे मात्र राज्य सरकारने संपकरी कर्मचा-यांनी कामावर परत रूजु व्हावे असे आवाहन केलेक़ाही कर्मचा-यांना यास प्रतिसाद दिला.मात्र शेकडो कर्मचारी अजून रूजू झाले नाहीत.अशा कर्मचा-यांवरील कारवाईसाठी राज्य शासनाने आता कडक भुमिका घेतली आहेक़ारवाईच्या धास्तीने मागील केवळ दोन दिवसात विविध विभागातील ७११ कर्मचारी कारमावर रूजु झाल्याने एसटीच्या चाकांना गती आली आहे.
नांदेड विभागात ११८ एसटी बसेस सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे. नांदेड एसटी विभागात एकूण २ हजार ८०६ कर्मचारी कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यापैकी १ हजार २८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. परंतू अनेकवेळा सांगुन देखील कर्मचारी कामावर हजर न झाल्याने ३१८ कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सध्या विभागीय कार्यशाळेतील नऊ कर्मचारी कामावर हजर झाल्याने कर्मचा-यांची संख्या १०९ इतकी झाली आहे. तर विभागीय कार्यशाळेतील ९० कर्मचा-यांपैकी १० कर्मचारी रजेवर आहेत.
नांदेड आगारात १४९, भोकर १६, किनवट ३४, मुखेड ९३, कंधार १०८, बिलोली ६८, देगलूर ७४, हदगाव ५४ व माहूर १६ असे ७११ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. विभागातील इतर कर्मचा-्यांनी देखील लवकरात लवकर कामावर हजर होऊन प्रशासनास सहकार्य करावे असे एसटी विभागाच्या वतीने आवाहन केले जात आहे.नांदेड विभागात एकुण कर्मचा-यांपैकी अर्धाच्या वर कर्मचारी कामावर रूजु झाल्याने एसटीला उत्पन्न सुरू झाले आहे.