
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
लातूर :- लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ.धीरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस भाकसखेडा ता.उदगीर येथे (दि.६) वार बुधवार रोजी श्री.जगदंबा देवी प्रतिष्ठान, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी,बालमित्रांना शालेय साहित्य भेट देत, निराधार ज्येष्ठ नागरिकांना संगायो, इंगायो, श्रावणबाळ योजनेचे धनादेश वाटप करण्यात आले. युवा मित्रांना डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाबाबत यावेळी मार्गदर्शन करीत आ.धीरज देशमुख यांना उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करीत मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामेश्वर गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक बी.एस.नांदापूरकर, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी हणमंतराव पवार, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बालासाहेब शिंदे अतनूरकर, गटसचिव संघटनेचे अध्यक्ष राम बिरादार, सरपंच अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, चेअरमन अशोकराव जाधव, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा मंडळ अधिकारी पंडितराव जाधव, तलाठी अंकुश वडगावे, ग्रामपंचायत सदस्य संतुकराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य गुलाब पठाण, ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य देवकते, शाखाध्यक्ष श्याम जाधव, दूध सोसायटीचे चेअरमन सुनील जाधव, परमेश्वर मोरे, गजानन जाधव, तुकाराम मोरे, नरसिंह जाधव, संजय तोबरे आदीजण उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संगायो, इंगायो, श्रावणबाळ योजनेचे धनादेश वयोवृद्ध, निराधार, विधवा, परितक्त्या व गावातील ज्येष्ठ नागरिकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पंडितराव जाधव यांनी केले.
तर आभार प्रदर्शन उपसरपंच अरविंद मोरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद मामा मोरे, दयानंद मोरे, तालुका प्रमुख काँग्रेस मीडिया सेल विवेक जाधव, सरचिटणीस गजानन जाधव, परमेश्वर मोरे, तुकाराम मोरे, तुकाराम कांबळे, लिंबाजी खेडकर, रामेश्वर मोरे, श्याम जाधव, नरसिंग जाधव, धनाजी मोरे, माधव जाधव, सुनील जाधव, हणमंत माणकेश्वरे, शशिकांत जाधव, विष्णू पाटील, गजानन जाधव, अशोक पाटील, गोपाळ जाधव, संतुकराव जाधव, पुरुषोत्तम जाधव, ज्योतीराम जाधव, राम जाधव, सहशिक्षक शिंदे, जाधव, कंजे, सलिम शेख सर, पांचाळ मॅडम, लादे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.