
दैनिक चालु वार्ता
शिर्डी विशेष प्रतिनिधी
निराज तांडेल
शिर्डी :- शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या दृष्टिकोनातून पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्तानं राज्यातील ७५ जीर्ण पोलीस ठाण्याचं बांधकाम करण्यात येईल.
राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिलेत. या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांत अधिक वाढ केली जाईल. असा शब्द राज्याच्या गृहमंत्र्यांना दिला. पोलिसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनानं राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही. पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगानं धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचं काम करण्यात येत आहे.
याबरोबरंच पोलीस दलाची मान खालावली जाईल असं काम पोलिसांनी करू नये, असं सूचित केलं. गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनीही एकमेकात समन्वय ठेवून काम करावं. गुन्हे कमी झाल्यास राज्याचं उत्पन्न वाढतं. जिल्हा नियोजनमधून पोलिसांना वाहनं उपलब्ध करून देण्यात येतील. दरम्यान यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.
शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचं बळकटीकरण होणं गरजेचं आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लँडिंग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलद गतीनं होईल.