
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
उदगीर :- येथील सहायक निबंधक सहकारी संस्था या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या पदावर बी.एस.नांदापूरकर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली असून त्यांनी आपला पदभार नुकताच घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे विविध संघटना, बँक, सहकारी संस्था, पतसंस्था, सोसायट्या, गटसचिव संघटनेमार्फत स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.
बी.एस.नांदापूरकर गेली १४ वर्षांपासून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट अधिकारी व सहकार अधिनियम, सहकार कायद्याप्रमाणे उत्कृष्टरित्या कामे व कार्य करत सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य पतसंस्था, बँक ग्राहकांना योग्य असे मार्गदर्शन, न्याय-निवाडा, शासकीय उपक्रम राबविण्यास पारंगत आहेत.