
दैनिक चालु वार्ता
संभाजी गोसावी
पुणे शहर प्रतिनिधी
पुणे :- हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक गुन्हे घडून येत असतात . त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने हडपसर पोलिस ठाण्यांतील डी बी पथकांतील पोलीस कर्मचारी नेहमीच सतर्क असल्यांचे दिसून येत आहे. यामध्ये हडपसर डी .बी पथकांचे सहायक फौजदार अविनाश गोसावी यांनी हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 10 फेब्रुवारी ते 31 मार्च २०२२ या कालावधीमध्ये एकूण 40 गुन्हे उघडकीस आणून त्यांमध्ये 14 घरफोड्या १३ वाहन चोर सराफांची फसवणूक ७ गुन्हे ३ जबरी व इतर गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे शहरचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांच्याहस्ते सहाय्यक फौजदार अविनाश गोसावी यांचे प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले . यावेळी हडपसर पोलीस ठाण्यांतील सर्व डी .बी पथकांतील पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडूंन गोसावी यांचे अभिनंदन करण्यांत आले.