
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- धसवाडी ग्रामपंचायत ता अहमदपूर जि. लातूर येथे भोंगळ कारभार ६ फेब्रुवारी २०२२ पासून ग्रामसेवक मेडिकल रजेवर गेला असून त्यांच्या ठिकाणी दुसरा ग्रामसेवक पाठवला असून तो पण आणखी कामावर आलेला नाही .आणि गेली चार वर्षे झाली पाणी फिल्टर ग्रामपंचायतीला शासनाने नागरिकांना दिले आहे .शुद्ध पाणी घरोघरी पोहचेल यासाठी दिलेले असून ४ वर्षाच्या काळात आतापर्यंत पाणी फिल्टर चा वापर झालेला नाही. या फिल्टरची जोडणी करून चार वर्षे झाली आहेत.
ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे हे पाणी फिल्टर धुळ खात ग्रामपंचायत मध्ये पडला आहे . शासन पिण्याच्या पाण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात आहे आणि एवढा निधी ग्रामपंचायत साठी येत असतांना आतापर्यंत सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे . अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये गावातील तरुण नेते रंजित क्षीरसागर आणि तरुणांनी यामध्ये विजय क्षीरसागर, संतोष भसमपुरे, सचिन क्षीरसागर, विजयकुमार क्षीरसागर, माधव देशमुख, गुंडेराव बोईनवाड, सुखदेव बोईनवाड, दत्ता क्षीरसागर, कैलास क्षीरसागर यांनी मागिल ग्रामसभेत चर्चा केली असता .
येत्या आठ दिवसात पाणी फिल्टर चालू करु असे आश्वासन सरपंच यांनी दिले होते पण आज दोन महिने होऊन सूद्धा यावर ग्रामपंचायतीने पाणी फिल्टर चालू केले नाही आणि खरकाडी तांडा येथे पाण्याची तारामळ असल्यामुळे वारंवार सरपंच यांना सांगून सुद्धा त्यांनी आणखी पाण्याची सोय केलेली नाही २७ /०३/२०२२ रोजी खरकाडी तांडा येथे पाण्याच्या टंचाई मुळे बैठक घेण्यात आली असून त्या बैठकीत पाण्याची सोय करू असे आश्वासन देऊन सुद्धा आणखी पाण्याची सोय केलेली नाही या वर योग्य ते निर्णय घेण्यात यावा असे ग्रामस्थ यांनी म्हटले आहे