
दैनिक चालु वार्ता
भिगवन प्रतिनिधि
जुबेर शेख
भिगवन :- मदनवाडी (ता. इंदापुर) येथील मदनवाड़ी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विष्णुपंत मछिंद्रनाथ देवकाते यांची निवड झाली.तर उपाध्यक्ष पदी दिलीप दत्तात्रेय ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मदनवाड़ी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. पदाधिकारी निवडीसाठी नूतन संचालक मंडळ यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी बोलावली होती. यावेळी अध्यक्ष पदासाठी विष्णुपंत देवकाते, सर्जेराव देवकाते व दिलीप ढवळे यांचे अर्ज आले. यामधे दिलीप ढवळे यांनी अर्ज माघारी घेतला.
विष्णुपंत देवकाते व सर्जेराव देवकाते यांच्या मधे लढत होऊन विष्णुपंत देवकाते यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली व उपाध्यक्ष पदासाठी दिलीप दत्तात्रेय ढवळे, गौतम सवाने व संगीता कुंभार यांचे अर्ज आले होते, यामधे दोघांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे दिलीप ढवळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक सर्जेराव देवकाते,पदमसिंह देवकाते, भगवान बंडगर,अरविंद देवकाते, नंदकुमार देवकाते,विनायक देवकाते, सुरेखा ठोंबरे,संगीता कुंभार,रोहिदास देवकाते, गौतम सवाने उपस्थित होते. संचालक मंडळ यांच्या वतीने नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.