
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित दादेगाव ता. आष्टी येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला श्रीराम नवमी उत्सव 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा सुरू झाला त्यामुळे भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे गुढीपाडवा ते श्रीराम नवमी अशा 09 दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, कावडी मिरवणूक, यात्रा, व कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो 9 दिवस दिवस हजारो भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो हे एक जागृत देवस्थान असल्याने भाविकांसाठी मोठं श्रद्धास्थान आहे त्यामुळे राज्यभरातील अनेक भाविक या यात्रा उत्सवा साठी उपस्थित राहतात.!!