
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- जगात अनेक रहस्यमय जमाती आहेत. या जमाती त्यांच्या परंपरा, जीवनशैली आणि खाद्यपदार्थांमुळे नेहमीच चर्चेत असतात. जगात राहणार्या आदिवासी प्रजाती आजही हजारो वर्ष जुन्या परंपरा पाळतात. या जमाती ज्या जंगलात राहतात त्या जंगलांवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. तिथली सरकारेही या प्रजातींच्या अधिकारात ढवळाढवळ करत नाहीत. जगातील यापैकी काही जमाती अत्यंत धोकादायक आहेत. इथिओपियातील भयंकर मुर्सी जमात यापैकी एक आहे.
या जमाती आणि त्यांच्या भयंकर चाली-रीतींबाबत बद्दल चला जाणून घेऊया. इथिओपियाच्या भयंकर मुर्सी जमातीच्या लोकांसाठी, एखाद्या माणसाला मारणे हे पुरुषत्वाचे लक्षण मानले जाते. ही जमात दक्षिण इथियोपिया आणि सुदान सीमेवरील ओमान खोऱ्यात राहते. या लोकांकडे अशी शस्त्रे असतात ज्याच्या मदतीने ते एका क्षणात कोणाचाही जीव घेऊ शकतात. त्यामुळे ही जमात सर्वात धोकादायक मानली जाते.