
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड महसूल कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला आहे. संपामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आधीच एसटीचे कर्मचारी संपावर असताना एसटीकडे महसूलचेही कर्मचारी संपावर गेल्यामुळे लाक वैतागले आहेत. महसूल विभागात रिक्त पदे भरावीत अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष संदीप भुरे, तालुकाध्यक्ष डी. एस. इलतेपवार, सहसचिव एम. एल. कांबळे, उपाध्यक्ष पी. जी. वारे, कोषाध्यक्ष नरेश घनशेट्टी यु. डी. मुकाडे, गुलाब शेख, सी. एम. पवार, यु. पी. सुभेदार, एच. ई. मुकलवार, के. एस. जुडावार, एम. डी. वांगीकर, एस. व्ही. वैद्य, बी. एल. सूर्यवंशी आदी सहभागी आहेत.