
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड तालुक्याचा बहुतांश भाग दुर्गम व डोंगराळ असून उन्हाळा ऋतूमुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पशुधन, जनावरांची व पशुपक्षांची सध्या चारा-पाण्यासाठी शिवारात भटकंती करावी लागत आहे. दुपारी जनावरे व वन्यप्राणीही झाडाच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. उन्हाळा ऋतु मार्च महिन्यात दुपारच्या उन्हाची तीव्रता सध्या ४२ अंशापर्यंत तापमान गेले आहे आणि तालुक्यात सिंचन क्षेत्र अत्यल्प असून खरिपावरच सर्व भिस्त आहे. शेतकरी शेतीकामात मग्न आहेत.
जांब बु. परिसरातील गावागावात वाडी-तांड्यावर पशुधनाचे संगोपन केले जाते. शिवारात वाढत्या उन्हात दावणीच्या जनावरांसह वन्यप्राणीही दुपारी सावलीचा आधार घेत आहेत. जनावरांसाठी नवा चारा येण्यासाठी आणखी चार-पाच महिने लागणार आहेत. कड़बा कमी असल्याने गुळीवरच भिस्त आहे. त्यात शिवारात प्रत्येकाच्या शेतात पाणी नाही. त्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असून चारा पाण्यामुळे दुभत्या जनावरांच्या दुधावर परिनाम झाल्याचा दिसतो. पशुधन व पशुपक्षी यांची चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे.