
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- ज्या कोरोनाला हरवण्यासाठी आजवर आपण मोठे सामूहिक कष्ट घेतले, त्याला सर्वात मोठं यश आलं आहे. नायडू हाॅस्पीटल सह शहरातील कोणत्याही रुग्णालयात एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचारांसाठी दाखल नाही. ही बाब आनंदाची व अभिमानाची आहे. आजच्या घडीला शहरात केवळ ९८ सक्रिय रुग्ण असून सर्व रुग्ण गृह विलगीकरणातच आहेत.
या यशाचे वाटेकरी सर्वच पुणेकर असून हीच स्थिती कायम राहील, ही आशा करुयात. विशेष म्हणजे अडीच वर्षापूर्वी नव्याने आलेल्या कोरोनाच्या साथीत प्रथम एक रूग्ण आपल्या पुणे शहरात आढळला आणि हेच पुणे शहर आज कोरोनामुक्त होण्याचे शहर ठरले आहे.