
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. शरद पवारांनी १९९० मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. अनेक ठिकाणी तंग वातावरण व हिंसा दंगली उसळल्या असे ठाकरेंनी प्रतिपादन केले. नजीकच्या काळात मनसे भाजपच्या अगदी जवळ जाणारे संकेत दिले गेले.
ह्यावर शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, भाजपा हा पक्ष स्वार्थी असून त्याने अद्याप पर्यंत त्यांना पाठींबा देणाऱ्या छोट्या पक्षांना तसेच इतर पक्षातून भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांना ह्या पक्षाने संपविण्याचे काम केले आहे, असा उदाहरणांसह इतिहास आहे. तेव्हा नवीन बकरा राज ठाकरेंनीही भाजपशी हातमिळवणी करताना ह्या गोष्टींपासून सावध रहावे असा मी त्यांना सल्ला देतो. रोहीत पवार हे शरद पवारांचे नातू असल्याने ह्या प्रतिक्रीयेकडे गांभीर्याने पाहिले जाते.