
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे, दि.८:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाषाण भागातील निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे तसेच स्मशानभूमी नूतनीकरण आणि सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी सुसखिंड येथील पुलाच्या बांधकामाची पाहणी करुन माहिती घेतली. या पुलाचे काम सद्यस्थितीत ८५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत वेळेत पूर्ण करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, बाबुराव चांदोरे, रोहिणी चिमटे,सुषमा निम्हण, बालम सुतार आदी उपस्थित होते.