
दैनिक चालु varta
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- वर्ध्यात MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. सदरील तरुणांचे नाव किशन ढगे या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. परीक्षेत नियुक्त न झाल्याने नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किशन ढगे वय २९ रा.भोगाव ता.पालम जि. परभणी येथील रहिवासी असुन तो सध्या देवळी तालुक्यातील नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून काम करत होता.
MPSC परीक्षेत नियुक्त न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे किसन ढगेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे. आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही’ म्हणून मी आत्महत्या करत आहे असे किसन ढगेने अर्जात नमुद केले आहे . माणुसकीची बांधीलकी जपत आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांच्या वतीने अर्थिक मदत करण्यात आली.
कुटुंबाची परीस्थिती हलाकिची असली तरी आत्महत्या हा एकमेव पर्याय नसतो. भाऊ तु अत्यंत चुकीचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी दिली. या कुटुंबीयांना धीर व आधार देत माणुसकीचे दर्शन घडवत आपण पण आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी यावेळी केले.