
दैनिक चालु वार्ता
संभाजी गोसावी
प्रतिनिधी पुणे शहर
पुणे :- पुण्यांत पोलिसांचा धाक राहिला की नाही असा सवाल आता पुणेकरांकडूंन होत आहे कारण कुठे कोयत्या गँगची यांची दहशतची तर कुठे, भर दिवसांत दुकानदारांची लुट कुठे, शाळेच्या आवारांत विनयभंग तर कुठे चालू रिक्षांत छेडछाड अशा सतत घटना शिक्षणांचे माहेरघर असलेल्या पुणे शहरांत घडत आहेत. तर पुण्यात गुन्हेगारीचा कळस झाला. पुणे स्टेशन परिसरांत चक्क भरदिवसा बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालय बलत्कार झाल्यांची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.
पुण्यांतील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयांत बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारांस ही घटना उघडकीस आली पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुंन बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यांत आला असून पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी कौटुंबियासह पुणे टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते शुक्रवारी दुपारी ती सार्वजनिक शौचालयांत गेली असता आरोपी तिच्या पाठोपाठ शौचालयांत गेला त्यानंतर तिला खाली पाडून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले यानंतर आरोपीने तिथून धूम ठोकली हा सर्व प्रकार पीडित मुलीने आपल्या आई सांगितला त्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत पुण्यांतील ही दुसरी घटना आहे.