
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
अहमदपूर :-आज दि.०९/०४/२०२२ रोजी आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी ता.अहमदपूर जि. लातूर येथे गरोदर माता आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरपंच सौ.बबीता मोरे, उपसरपंच श्री गिरीधर पौळ, श्री. अशोक मोरे, आदर्श शिक्षक मुख्याध्यापक श्री. गुळवे सर , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.कुंभार ,आरोग्य सेविका सौ ठाकूर आरोग्य सेवक श्री दराडे,आशा कार्यकर्त्या सौ काळे, सौ. पांचाळ, सौ कांबळे, सौ बोबडे, सौ वाघमारे सौ दोरवे, अंगणवाडी सेविका खोमणे,सुर्यवंशी, पोले,लामतुरे, कामखेडकर उपस्थित होते. यावेळी 47 गरोदर माता आरोग्य तपासणी करण्यात आली .