
दैनिक चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज,गो अभ्यंकर सचिव शशांक बर्वे यांचेसह काही पदाधिकारी चंद्रपूर जिल्ह्याच्या केंद्र राज्य शासन पुरस्कृत अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी इत्यादी समाजातील समस्याचे निराकरण व माहिती जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर आले होते. यावेळी अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आबीद अली यांचे नेतुत्वात अॅड शाकीर मलक साजिद बियाबानी रफीक शेख अलताफ मिर्जा इत्यादी आयोग अध्यक्षांची भेट घेऊन शिष्टमंडळाने प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही.
गेल्या दोन-तीन वर्षापासून सर्व शिक्षा अभियान समग्र समग्र शिक्षण योजना कागदावर राबविल्या जात आहे जिल्ह्यामध्ये 35 पेक्षा अधिक मदर्से कार्यान्वित असताना डॉक्टर जाकिर हुसेन मौलाना आझाद मदरसा आधुनिकीकरण योजना जिल्ह्यात कुठेही राबवली गेली नाही मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये अंगणवाडी निर्माण करण्याची मागणी असतानासुद्धा याबाबत कोणतेही नियोजन केले गेलेले नाही मौलाना अजित आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवसायिक व शैक्षणिक कर्ज उपलब्ध होत नाही. जिल्हा स्तरावर योजनेची पुरेपूर माहिती नाही कार्यालय नाही प्रधानमंत्री आवास योजनेत पंधरा टक्के अल्पसंख्यांकांना लाभ देण्याचे नियोजन झालेले नाही यापूर्वी इंदिरा आवास योजनेच्या मंजूर घरकुलांची कामे जागेअभावी झालेली नाही.
मुस्लिम बहुल क्षेत्र विकासाचा कोरोना काळात निधी परत गेला त्यामुळे अनेक ठिकाणची कामे झालेली नाही नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती व मुस्लिम लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना आवश्यक क्षेत्र विकास कामासाठी दर वर्षी निधी उपलब्ध करून देण्याबाबत असा नियोजन करण्यात आलेला नाही समाजामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत योजना निवड प्रसिद्धीसाठी आहे का अशी भावना निर्माण झाली गेल्या सात वर्षापासून जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीची जिल्हा स्तरावर समिती गठित झालेली नाही गेल्या सात वर्षापासून पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी या जिल्ह्यात झालेली नाही आयटीआय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनेक युवकांनी प्रशिक्षण घेतले मात्र बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध झालेले नाही.
मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी पोलीस भरती व एम पी एस सी भरती पूर्व प्रशिक्षण इत्यादीबाबत समाधान कारक प्रगती नाही मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने निवासी आश्रम शाळेच्या धर्तीवर प्रयोगिक तत्वावर आश्रम शाळा सुरू कराव्या तसेच सब्री रमाई योजनेच्या धर्तीवर मा फातिमा आवास योजना सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली याबाबत आवश्यक ती नोंद घेतल्या जाईल अशी ग्वाही दिली जिल्हा परिषद कन्नमवार सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या आढाव्यात अनेक विभागाला पंधरा कलमी कार्यक्रम याबाबत माहिती नसल्याचे निवड अहवाल देऊन समाधान करण्यात आले.
मात्र आढावा घेत असताना अल्पसंख्यांक कल्याण विभागाच्या योजना जिल्ह्यामध्ये समाधान कारक नसल्याचे खंत व्यक्त करीत गांभीर्याने अंमलबजावणी करा अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिलेल्या यावेळी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिताली शेट्टी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे अतिरिक्त अधिकारी विद्युत वरखेडकर सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे आयोगाचे सदस्य आर डी शिंदे किशोर मेंढे विशेष कार्य अधिकारी महेश सूर्यवंशी यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. देण्यात आलेली माहिती अभ्यासपूर्ण व वस्तुस्थिती दर्शक नसल्याचे अध्यक्षांचे लक्षात येताच अल्पसंख्यांक कल्याणच्या कार्यक्रम कागदावर ठेवू नका.
अशी खंत व्यक्त करीत दिलेल्या वाचन केलेल्या अहवाल अल्पसंख्यांक कल्याण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले नसल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी गेलेली माहिती व प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम यातील प्रगती व साध्य यावरून पितळ उघडे पडले हे मात्र विशेष यावेळी अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक संघटनेने अखेरच्या घटकापर्यंत केंद्र राज्य सरकारच्या योजनेची माहिती होत नाही अशी खंत व्यक्त केली.