
दैनिक चालु वार्ता
मुखेड ता प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- १९ वर्षाच्या युवकावर चाकुने सपासप वार करण्याची घटना मुखेड़ शहरातील बसस्थानकाच्या बाजूस असलेल्या देशी दारु दुकानाच्या बाजूस शिनवारी रात्री १०. ३० च्या दरम्यान घडली. गोविंद शेळके (वय १९ रा. गायत्रीगल्ली, मुखेड) असे जखमीचे नाव आहे. जखमी गोविंद यांच्या गळ्यावर, छातीवर व दंडावर चाकुचे वार बसले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलिस शिपाई सचिन मुतेपवार, प्रदीप शिंदे, मारोती मेकलेवाड, शिलरत्न गायकवाड, प्रकाश चव्हाण यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोविंद यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत घटनेचे कारण कळाले नाही. रुग्णालयात वै. अ. संतोष टाकसाळे, कल्पाना बा-हाळे, जयश्री गायकवाड, तुकाराम पाये यांनी प्राथमिक उपचार करून गोविंद यांना नांदेडला पाठवि