
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
देगलूर :- श्री प्रकाश उत्तम हसनाबादे हे भारतीय सैन्य दलामध्ये सन २०२१ मध्ये लिंगायत या जातीतून खुल्याप्रवर्गातुन भरती झाली सैन्यातील कर्तव्य पुर्ण करुन माजी सैनिक म्हणुन जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड नांदेड येथे २०१७ मध्ये रोजगारासाठी नोंदणी केली आहे. सदरील माजी सैनिक प्रकाश उत्तम हसनाबादे यांनी पोलीस शिपाई भरती २०१८ च्या अनुषंगाने पोलीस शिपाई पदासाठी अर्ज भरले त्यामधुन त्यांनी वाणी या जातीचा इ.मा.व प्रवर्गातून पोलीस शिपाई पदावर नियुक्ती मिळविली आहे. नियुक्ती मिळविल्यानंतर कागदपत्रे तपासणी व जमा करतावेळी त्यांच्याजवळ वाणी या इ.मा.व जातीचे प्रमाणपत्र त्यांच्याजवळ नसल्यामुळे नियुक्ती मधुन माघार घेतले आहे येथे अशाप्रकारे गृह / पोलीस विभागाची एक फसवणुक केली आहे.
फसवेगिरी करण्याचा प्रयत्न वारंवार करणाऱ्या माजी सैनिकाचे वाईट विचार काही थांबना पुन्हा त्यांनी तलाठी पद भरती २०१९ च्या शासनाच्या जाहिरातीनुसार नौकरीचे फार्म भरुन नियमानुसार लेखी परीक्षा दिल्याचे कळते परंतु मेरीट मध्ये आहे का शंकाच आहे. पुढे फसवेगिरीत प्रगती करत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रतीनिधी श्री. शेटे यांना हाताशी धरुन माजी सैनिक प्रमाणपत्र, कागदपत्र तपासनी सुची मध्ये पात्र ठरवुन घेतले आहे. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती नांदेड यांनी श्री. प्रकाश हसनाबादे हे माजी सैनिक असल्याबद्दल सहानभुती दाखवुन कागदपत्र, अभिलेख तपासणी सूची कडे काना- डोळा केले आहे.
मा. जिल्हाधिकारी यांनी श्री हसनाबादे यांना अंतिम निवड करुन तलाठी पदावर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यासाठी श्री. शक्ती कदम उपविभागिय अधिकारी देगलूर यांच्या कडे उमेदवार माजी सैनिक आहे का कसे त्यांनी यापुर्वी माजी सैनिक असल्याचा लाभ घेतला का नाही याची खात्री करुन नियुक्ती आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले आहे. सदरील उपविभागिय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक माजी सैनिक श्री. प्रकाश उत्तम हसनाबादे यांच्या मिल्ट्री डिस्चार्ज बुक वर जात लिंगायत आहे. हे स्पष्ट दिसत असताना त्यांनी वाणी या जातीचे व ओ. बी. सी. प्रवर्गातुन तलाठी पदावर नियुक्ती दिली आहे.
शासनाची आणि जिल्हा निवड समितीची फसवणुक करणारे श्री. प्रकाश उत्तम हसनाबादे यांच्यावर आणि श्री. शक्ती कदम उपविभागिय अधिकारी यांच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हे दाखल करुन हसनाबादेची तात्परती नियक्ती रद्द करावी असे माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष श्री. एस. एस. खैरवाड यांनी दि. ४ एप्रिल २०२२ रोजी उपोषण करुन मागणी केली आहे. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी श्री. विपीन इटनकर साहेबांना भेटुन बोगस तलाठी माजी सैनिकावर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. सदरील निवेदनावर श्री. माधवराव वडजे, जिल्हाध्यक्ष (मा.अ.का.सं. नांदेड) श्री. पांडुरंग कंधारे, श्री. व्यंकट जाधव शिरशी (पत्रकार), श्री. व्यंकटी गणपती इटकापल्ले (स्वतंत्र सैनिक), श्री. महाजनराव शंकर पिंपळदरे (आणिबाणी संघटना कार्यकर्ता ), श्री बाबुराव शिवाजी चांडोळकर, सय्यद अली मंजुर अली, श्री. बालाजी दशरथ जाधव इ. कार्यकर्त्याचे स्वाक्षरी आहेत.