
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- बिलोली तालुक्यातील केसराळी गावचे भूमिपुत्र डॉक्टर मधुकर गायकवाड यानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभाग प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशबरोबरच मराठवाड्यातील तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.