
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई
देशाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष पंतप्रधान ना.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांची दिल्ली येथे आमदार व खासदार सदिच्छा भेट घेतली. प्रसंगी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे जलविद्यूत निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे १०० टिमसी पाणी कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविण्यात आले असून पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची बाब माननीय पंतप्रधान महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी माढा लोकसभेचे खासदार मा. श्री. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार मा. श्री.जयकुमार गोरे, पंढरपूरचे आमदार मा. श्री. समाधान अवताडे, विधानपरिषद सदस्य मा. श्री. सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.