
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- लोहा तालुक्यातील सायाळ येथे सोयाबीन उगवण शक्ती प्रात्यक्षिक ग्रामपंचायत कार्यालय सायाळ येथे तालुका कृषी विभागातर्फे सोयाबीन प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक कोपनर मॅडम यांनी व सायाळचे प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे उगवण शक्ती तपासल्याशिवाय पेरणी करू नये शेतकऱ्यांनी शक्यतो घरचेच सोयाबीन बियाणे पेरणी निवडावे सोयाबीन बियाणे पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच शेतात पेरावे सोयाबीन बियाणे पेरते वेळेस जास्त खोलवर जाणार नाही व जमिनीवर उघडे राहणार नाही या दोन्ही बाबतीत शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी सोयाबीन बियाण्याची उगवण शक्ती 60 टक्केपेक्षा कमी असल्यास सदरील बियाण्याची शेतकर्यांनी पेरणी करू नये असे मोलाचे मार्गदर्शन कृषी सहाय्यक कोपनर मॅडम यांनी व शाळेचे शेतकरी रत्नाकर पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले .
शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय येथे युवा शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांनी आमंत्रित केले व गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी भरभरून उपस्थित राहिले रत्नाकर पाटील ढगे ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई गंगाधर पवार ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पांडुरंग राठोड नंदाबाई बळीराम पवार मिराबाई बालाजी बुडूगुळे गंगाधर विश्वनाथ पवार राजू ढगे राघोजी ढगे गंगाधर नारायण पवार बाळासाहेब पवार त्र्यंबक पवार आनंद मोरतळे गजानन मोरतळे संभाजी ढगे सखाराम राठोड दत्ता आंबोडे बाळासाहेब मोरताटे दत्ता मोरताटे अनेक शेतकरी उपस्थित होते.