
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथे दि 9-4-2022 रोजी भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणी येथे बी. कॉम. द्वितीय वर्गात शिक्षण घेत असलेला कुस्ती पट्टू प्रविण बाजीराव पाटिल यांने नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. 64 व्या वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे छत्रपती शाहु महाराज क्रीडांगणावर प्रचंड अशा प्रेषकांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या .मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या वर्षामध्ये सूरू झाल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील ईतर कुस्तीपट्टूंचा निसटता पराभव झाला.
पण पहिलवान प्रविण पाटिल याने 79 की. ग्रॅम वजन गटात अतिशय अतिटतीच्या झालेल्या स्पर्धेत नेञदिपक अशा लढती करूण व काष्य पदकावर आपला दावा सिद्ध केला. कुस्तीतील मानाचे पुरस्कार व स्पर्धा प्रविण पाटिल ने गाजविला. जालना येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन कुस्तीत सूध्धा रजत पद मिळविलेले होते. प्रविण पाटिल हा परिस्थिती ने गरीब कुटुंबातील असुन वयाच्या अवघ्या नऊ वर्षापासून त्याने कुस्त्या खेळण्यास सुरवात केली. सध्या तो कुस्तीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे कोल्हापूर येथे प्रशिक्षक तानाजी पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल मोरे (भैय्या ) उपाध्यक्ष मा. अश्लेष मोरे (भैय्या), संस्थेचे सचिव मा. जनार्धनअण्णा साठे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच .एन .रेडे ,उप -प्राचार्य डॉ मुंडे ,डॉ.ऐल्लुरे सर. डॉ. खराडे सर , डॉ. मुंगळे सर ,डॉ. गावित, डॉ. धनेराव, प्रा. डॉ. चोचंडे मॅडम डॉ. सुरवसे सर तसेच महाविद्यालयाचे क्रिडा क्रीडासंचालक प्रा. डॉ. ए. सी. पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील क्रिडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.