
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आज दिनांक 11 एप्रिल 2022 वार-सोमवार रोजी बळीराम पाटील प्राथमिक शाळा,भोपाळवाडी.केंद्र-सा.का.गांधीनगर. ता.लोहा जि.नांदेड. या शाळेत क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती व इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेऊन पुढील शिक्षणासाठी पुढच्या शाळेत जाण्यासाठी इयत्ता 1ली,2री व 3री च्या विद्यार्थ्यांकडून निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमात सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून इयत्ता 4 थी विद्यार्थ्यांनी गुरुजी होऊन इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा अनुभव घेऊन आतापर्यंतचे या शाळेत आलेले शालेय अनुभव आपल्या मनोगतातून सांगितले.या कार्यक्रमात विशेष म्हणजे मागिल 2 वर्षीच्या 4थी च्या विद्यार्थ्यांचा covid-19 मुळे निरोप घेता आला नाही.अशा विद्यार्थ्यांना यावर्षी बोलावून घेऊन त्यांनाही निरोप देण्यात आला.तसेच शेवटी शाळेच्या वतीने सर्वांना गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली.