
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- हनुमान जयंतीनिमीत्त नगरनाका – दौलताबाद टी पॉईंट ते दौलताबाद घाट पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वाहतूक शाखेने सुचवले आहेत. हनुमान जयंतीला संपूर्ण राज्यासह देशभरातून भाविक येत असतात. शिवाय कोविडचे निर्बंधही उठवले आहे. यामुळे भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने याचे अगोदरच नियोजन केले आहे. दिनांक १६/०४/२०२२ रोजी हनुमान जयंती आहे.
हनुमान जयंतीनिमीत्त खुलताबाद येथे असलेले श्री भद्रा मारुती मंदिर येथे दिनांक १५/०४/२०२२ रोजी सायंकाळपासून श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, औरंगाबाद शहर व परिसरातून सामूदायिकरित्या भाविक पायी व वाहनाने दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. औरंगाबाद- धुळे (जुना रोड) या महामार्गावर जड व इतर वाहनांची वर्दळ असते. श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणारे भाविक व सदर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होवून एखादा अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूकीचे नियमन करणे आवश्यक
पर्यायी व्यवस्था
१) दौलताबाद टी , माळीवाडा , फतीयाबाद , जांभाळा गाव , कसाबखेडा , वेरुळ मार्गे पुढे जातील व येतील.
२ दौलताबाद टी , माळीवाडा नविन NH – ५२ ( सोलापूर – धुळे हायवे ) मार्गे पुढे जातील व येतील.
३) धुळे , नाशिककडे जाणारे वाहने ही नगरनाका मार्गे एएसक्लब , नविन NH – ५२ तसेच साजापूर , करोडी शरणापूर फाटा मार्गे पुढे जातील.
वाहतुक बंदोबस्त प्रभारी अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतुक वळवतील व मार्गात बदल करतील. अधिसुचना ही अत्यावश्यक ( सेवा उदा . पोलीस , रुग्णवाहिका , अग्निशमन दल अशा ) वाहनांस लागू नाही. या अधिसुचनाचा भंग करणारी व्यक्ती म.पो. कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल शरद ढुमे यांनी दिली.