
दैनिक चालु वार्ता
परभणी :- येथे राज्य खो-खो क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून परभणी चे आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले की, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील व्यक्तीमत्व संजय मुंढे हे आहेत. परभणी शहरातील विविध भागात 10 क्रीडांगण उभारण्यात येणार आहेत ,व त्यासाठी 28 कोटी चा निधी उपलब्ध करून दिला. खेळाच्या माध्यमातून शहरातील नागरीकांचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त ठेवाता येईल. या सोबत शैक्षणिक क्षेत्रासाठी सायन्स पार्क उभारणी साठी 20कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. क्रीडा सोबत कलेचा अविष्कार परभणीत आहे. कलेला वाव मिळण्यासाठी 18 कोटीचे नाट्य सभागृह उभारण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंढे सरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अध्यक्ष स्थानी ज्ञानोपासक महाविद्यालय उपप्राचार्य विजय घोडके, तर प्रमुख उपस्थितीत माजीप्राचार्य डॉ. वसंत लटपटे, प्रा.रामदास जायभाये,गुरुवर्य भागवानराव शेळके , पत्नी सौ.अंजली मुंढे उपस्थित होते. कार्यक्रम चे प्रस्ताविक प्रकाश टाकळे, मनोगत- मिनल धावंडकर, प्रा.नागनाथ गजमल, प्रा. नागेश गजमल, गोपाळ मोरे यांनी केली. कार्यक्रम चे सुत्र संचलन रणजित काकडे, तर आभार प्रदर्शन तुकाराम खंटीग यांनी केले. सरांचा सत्कार आयोजन समितीच्या हार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.संतोष कोकीळ, प्रा. राजेसाहेब रेंगे, डॉ. राजेश्वर देशमुख, महेश पारवेकर, पी.आर.जाधव, डॉ. बाळासाहेब कदम, नगरसेवक नवनित पाचपोर, गंगाधर लटपटे व परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटना: चेतन मुक्तावार, सॉफ्टबॉल संघटना : पांडे, हँन्डबॉल संघटना: राजेश शहाणे, टेनिसव्हॉलीबॉल संघटना :सतिश नावाडे यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. आयोजन समिती प्रकाश टाकळे,तुकाराम खंटीग, प्रभाकर गमे, राम सुरवसे, संतोष शेटे, गणेश माळवे, रामराव खंटीग, पवन वाघ, वसंत लंगोटे, प्रशांत नाईक आदीने परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.