
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन यांनी पदार्पणाच्या सामन्यातील शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केल्याबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे. कुलदीपला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मार्कस स्टॉइनिससारख्या दिग्गज खेळाडूसमोर 15 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जी त्याने उत्तम प्रकारे पार पाडली. या 25 वर्षीय गोलंदाजाने शेवटच्या 6 चेंडूत केवळ 11 धावा दिल्या आणि आपल्या संघाला 3 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला.
कुलदीप सेन हा मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील हरिहरपूर गावचा आहे. त्याचे वडील रामपाल सेन यांचे शहरातील चौकात छोटेसे हेअर सलूनचे दुकान आहे. रामपाल आणि गीता सेन यांना ५ मुले आहेत. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने दशकापूर्वी विंध्य क्रिकेट अकादमी क्लबमधून क्रिकेटला सुरुवात केली.
कुलदीप सेनने 2018 मध्ये मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पंजाबविरुद्ध एका डावात 5 विकेट घेतल्या होत्या. कुलदीपने पदार्पणाच्या मोसमात एकूण 25 बळी घेतले.
रीवा जिल्ह्याच्या या आश्वासक गोलंदाजाकडे ताशी 135 ते 140 किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. स्विंग आणि आऊट स्विंग दोन्हीमध्ये त्याने प्रभुत्व मिळवले आहे. कुलदीप सेनने आतापर्यंत रणजी ट्रॉफीच्या 14 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत. प्रशिक्षक एरियल अँथनी 2018 पासून कुलदीपला सतत प्रशिक्षण देत आहेत. कुलदीपच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले.