
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अभिनेत्री कंगनाच्या धाकड या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला आहे. रियल लाईफमध्ये देखील धाकड असणाऱ्या कंगनाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहे. गेल्या वर्षी कंगनाचा थलायवा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाच्या धाकडमुळे नेटकऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून मिरवणाऱ्या कंगनाच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. स्वताच्या नावावर चित्रपटगृहामध्ये खेचणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कंगनाचे नाव घ्यावे लागेल.
कंगनाची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा धाकड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. त्याचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. व्हायरल झालेल्या टीधरमध्ये कंगनाचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना दिसून आला आहे. त्या टीझरची सुरुवात ही स्पाय एजंट अग्नीची भूमिका कंगनानं साकारली आहे. तिच्या लूकवर फिदा होत नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. काहींनी तिच्या भूमिकेचं कौतुकही केलं आहे. कंगनाच्या फिल्मोग्राफीविषयी बोलायचे झाल्यास, तिनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिची लोकप्रियता मोठी आहे.
धाकडचा टीझर हा एक मिनिटं आणि 21 सेकंदाचा असून त्यातून कंगनाचा एक वेगळा लूक समोर आला आहे. धाकड हा थ्रिलिंग सस्पेन्स चित्रपट आहे. धाकडमधील दृष्ये ही आंतरराष्ट्रीय टेक्निशियन व्दारा डिझायन आणि कोरिओग्राफ करण्यत कंगनानं धाकडचा टीझर शेयर करताना त्याला एक कॅप्शनही दिलं आहे. त्यात ती म्हणते, अॅक्शन, स्टाईल आणि थ्रिलर असा धाकड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका युझर्सनं कंगनाचं कौतुक करताना म्हटलं आहे की, बाप रे, मी आता जो लूक पाहिला आहे तो एकदम प्रभावित करणारा आहे. आपल्या नवीन प्रोजेक्टला मनपूर्वक शुभेच्छा. धाकडमधल्या लूकचे कंगनाच्या चाहत्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे.