
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- न्यासा देवगणचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकतंच जेव्हा याबाबत अजय देवगणला विचारण्यात आलं त्यावेळी त्यानं न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
न्यासाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकतंच जेव्हा याबाबत अजय देवगणला विचारण्यात आलं त्यावेळी त्यानं न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. अजय देवगणची मुलगी न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. एका मुलाखतीत मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला, ‘मला माहीतच नाही की, तिला या क्षेत्रात यायचं आहे की नाही.
अद्याप तिनं या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची रुची दाखवलेली नाही. पण मुलांसोबत अनेक गोष्टी अचानक बदलतात. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं. सध्या ती परदेशात असून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.’ न्यासा देवगण सध्या परदेशात आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेत आहे. त्याआधी तिनं ३ वर्षांपूर्वी सिंगापूरमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. न्यासाचा जन्म २००३ साली झाला होता.
अजय देवगण आणि काजोल यांना न्यासा व्यतिरिक्त युग हा एक मुलगा देखील आहे. अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘रनवे ३४’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच अजय देवगणनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे.