
दैनिक चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ भुस्से
नांदेड :- बालविकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प प्र. क्र. ३ येथील सिद्धार्थ नगर केंद्र कर.१७ व सह्याद्री नगर केंद्र क्र.१९ या अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदेड ब यांच्या वतीने खुर्च्या व सतरंजी भेट देण्यात आली. अंगणवाडी केंद्रातील कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे, बँकेचे दत्ता सोनसाले,क्षेत्र विक्री व्यवस्थापक संतोष कोसेगावकर क्षेत्र विक्री व्यवस्थपाक आदी उपस्थितीत होते.
यावेळी प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे म्हणाले की अंगणवाडीत आपल्या मुला-मुलींना पाठऊन शैक्षणिक ओढ लागावी व बालकाचे भविष्य उज्वल करावे असे आवाहन पालकांना प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी केले.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्य सेविका वैशाली मेघमाले,मंदाकिनी भगत,शोभा भालेराव,मीनाक्षी आळणे,दिपाली भिसे आदी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.